बंगळुरू : विविध देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, या पार्श्वभूमीवर भारतालाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटकात आरोग्य विभागाने विमानतळांवर अलर्ट जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व विमानतळ, बंदर परिसर आणि दाट लोकवस्तीच्या भागात मंकीपॉक्सवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
सर्व विमानतळांवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रीनिंग सुचवण्यात आले आहे. मंकीपॉक्सच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी बेंगळुरूचे इंदिरानगर हॉस्पिटल आणि मंगळुरूचे वेनलॉक हॉस्पिटलमध्ये सोय केली गेली आहे. मंकीपॉक्स आढळल्यास 21 दिवस अनिवार्य क्वारंटाईन तसेच संशयितावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta