बंगळूर : चित्रदुर्गस्थित रेणुका स्वामी खून खटल्यातील ए १ आरोपी पवित्रा गौडा आणि ए २ आरोपी अभिनेता दर्शन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपीना काल जामीन मंजूर करण्यात आला.
एसपीपी प्रसन्न कुमार यांनी दर्शन आणि पवित्रा गौडा यांच्या जामीन अर्जावर आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मागितला आहे. न्यायालयाने परवानगी दिली. ५७ व्या सीसीएच न्यायालयाचे न्यायाधीश जयशंकर यांनी सुनावणी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. रेणुका स्वामी खून प्रकरणाच्या तपासाअंती पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र न्यायालयात सादर केले.
तीन आरोपींना जामीन
रेणुकास्वामी खून खटल्यातील आणखी एका मोठ्या घडामोडीत, तीन आरोपींना आज जामीन मिळाला. ए १५ आरोपी निखिल नाईक, ए १६ आरोपी केशवमूर्ती आणि ए १७ आरोपी कार्तिक यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा या हत्येशी काहीही संबंध नसून मुख्य आरोपींनी आमिष दाखवून मृतदेह घेऊन जाताना पोलिसांना शरण येण्याचीच त्यांची भूमिका असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
रेणुकास्वामी यांचा मृतदेह सापडल्याच्या दुसऱ्याच दिवशी कामाक्षीपाळ्य पोलिस ठाण्यात आले आणि १० जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण केले.