विजयपूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर भ्रष्टाचाराच्या उंबरठ्यावर आहेत, मागील पापांची फळे मिळत आहेत, असे विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले.
त्यांनी ईश्वरप्पा यांच्यावर ताशेरे ओढले की, त्यांचा घडा पापांनी भरलेला आहे ज्यामुळे त्यांना आधी राजीनामा द्यावा लागला. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एफडीसीच्या आत्महत्येबाबत आमदार बसनगौडा यत्नाळ यांनी विजयपूर येथे प्रतिक्रिया दिली आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पीए म्हणून नाव लिहून बेळगावात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कामासाठी पाच-सहा हजार लाच द्यावी लागते. लक्ष्मी हेब्बाळकर पीएचे नाव लिहिण्यासाठी तुम्ही जबाबदार आहे. मंत्री पीएकडून वसुली करतात असे सांगून त्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.