Saturday , December 13 2025
Breaking News

पोटनिवडणुकीत तिन्ही प्रमुख पक्षाना प्रत्येकी एक जागा?

Spread the love

 

गुप्तचर विभागाचा सरकारला अहवाल

बंगळूर : कर्नाटकातील तीन मतदारसंघांची पोटनिवडणूक सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-धजद आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. तिन्ही मतदारसंघात मतदान पार पडले असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली असून राजकीय पक्षांच्या कॉरिडॉरमध्ये अनेक गणिते सुरू झाली आहेत. सत्ताधारी काँग्रेसला तीन जागांवर विजयाची अपेक्षा असताना भाजप-धजद युतीही तिन्ही मतदारसंघात विजयी होणार असल्याचे सांगत आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाचा अहवाल सरकारपर्यंत पोहोचला असून, काँग्रेस सरकारचे सारे मनसुबे उधळतील, असे दिसते. भाजप-धजद युती सरकारला हादरा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१३ नोव्हेंबर रोजी चन्नपट्टण, संडूर आणि शिग्गावी विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले होते. चन्नपट्टण, शिग्गावी आणि संडूर या मतदारसंघात अनुक्रमे धजद, भाजप आणि काँग्रेसचे आमदार होते. तसेच आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली असल्याची माहिती आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की गुप्तचर विभागाने शिग्गावीमध्ये भाजप, संडूरमध्ये काँग्रेस आणि चन्नपट्टणमध्ये धजद उमेदवार पुढे असल्याचा अहवाल दिला आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालामुळे काँग्रेसची निराशा झाल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्याने या तीन मतदारसंघातील आमदारांनी आपल्या आमदार पदांचे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर तीन मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. मुख्यतः काँग्रेसच्या हमींवर विसंबून भाजप-धजद युती राज्यात कोणताही विकास झालेला नाही, व्यापक भ्रष्टाचार सुरू आहे आणि मुस्लिम तुष्टीकरण केले जात आहे, असे आरोप करून जनतेसमोर गेले आहेत. डी. के. शिवकुमार – चन्नपट्टणमध्ये एच. डी. कुमारस्वामी, संडूरमध्ये संतोष लाड आणि जनार्दना रेड्डी यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
यापुढे काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार तिन्ही मतदारसंघात पक्षाचा विजय होण्याची शक्यता आहे. यावेळी शिग्गावीत जादू घडली. २००८ पासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ खेचून आणण्याची संधी काँग्रेसला मिळत आहे, हा काँग्रेसचा हिशोब आहे. सी. पी. योगेश्वर यांच्या आगमनाने चन्नपट्टणमध्येही काँग्रेसला विजयाची संधी असल्याचे बोलले जात असून, सांडूरमध्ये काँग्रेस आपले वर्चस्व कायम ठेवू शकेल, असा अंदाज काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. मात्र, भाजप-धजद युतीच्या गणनेनुसार शिग्गावीमध्ये भाजप पुढे आहे, तर चन्नपट्टणमध्ये धजदचे वर्चस्व आहे. सांडूरमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
तीन मतदारसंघांपैकी सीपी योगेश्वर आणि निखिल कुमारस्वामी यांच्या लढतीमुळे चन्नपट्टणला मोठा गाजावाजा झाला आहे. ज्या मतदारसंघात लढत सुरू होती, त्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी सर्व काही बदलले असून धजदच्या विजयाची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मंत्री जमीर अहमद यांचे वक्तव्य आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची सततची मोहीम निखिलसाठी वरदान ठरल्याचं म्हटलं जात आहे. खुद्द काँग्रेसचे उमेदवार सी. पी. योगेश्वर यांनीही हे मान्य केले असून निकालापूर्वीच त्यांनी पराभव स्वीकारल्याचे दिसून येत आहे. चन्नपट्टण मतदारसंघात जोरदार सट्टेबाजी सुरू असून निखिल कुमारस्वामी हे सट्टेबाजांचे हॉट फेव्हरेट आहेत.
शिग्गावीत यावेळी लढत असली तरी भाजपचे उमेदवार भरत बोम्मई यांचा विजय होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे उमेदवार यासिर पठाण यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. तिकिटाच्या मुद्द्यावरून शिग्गावी काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले. त्याचाही निवडणुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सांडूरमध्ये खासदार ई. तुकाराम यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांना विजयी करण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचा विजय मृगजळ ठरू शकतो, असे बोलले जात आहे. माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत आणि सिद्धरामय्या यांचा सततचा प्रचार काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *