Wednesday , December 18 2024
Breaking News

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love

 

बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह तीन जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. प्रयागराज न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या केसमध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निकिता आणि अतुल यांच्याबाबत जौनपूर कौटुंबिक न्यायालयात खटल सुरू होता, त्यावेळी निकिता अतुलकडून 80 हजार रुपये मेंटेनन्स का मागत होती याचा खुलासा समोर आला आहे.

कोर्टात समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, अतुलचं असं म्हणणं होतं की तो निकिताला मेंटेनन्ससाठी 80 हजार रुपये देऊ शकत नाही. निकिता स्वत: चांगले पैसे कमावते, मग तिला मी दरमहिन्याला 80 हजार रुपये का द्यावे, असा अतुलचा सवाल होता. त्यावर निकीताने दिलेल्या उत्तराचा आता खुलासा झाला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिने जौनपूरमध्ये 60 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता, त्यासाठी तिने कर्जही काढलं होतं. त्याचा हप्ता तिला दर महिन्याला भरावा लागतो. तिचा सर्व पगार त्यामध्येच जातो, त्यामुळेच तिला तिच्या महिन्याभराचा खर्च करणं कठीण होतं, असा निकीताचा दावा होता.

मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अतुलने 24 पानांची सुसाईड नोट लिहीली होती आणि 1 तासाचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये अतुलने आपल्या मृत्यूसाठी पाच जणांना जबाबदार धरले. आपली पत्नी, सासू, भावजय, चुलत सासरे आपल्याला पैशांसाठी सतत त्रास देत आहेत. माझ्यावर एकापाठोपाठ एक असे एकूण 9 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप त्याने केला होता.

आपली पत्नी स्वत:घर सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. आमचा मुलगा व्योमलाही सोबत नेलं. साडेतीन वर्षांपासून मला माझ्या मुलाला पाहण्याची इच्छा आहे. मला त्याचा चेहरा बघण्याचीही परवानगी नाही. ना त्याच्याशी कधी बोलता येतं. माझा मुलगा कसा दिसतो हे मी विसरलोय, जुने फोटो पाहिले की मगच मला त्याचा चेहरा आठवतो. मुलाचा शस्त्र म्हणून वापर करत माझी पत्नी पैसे उकळते, असा आरोपही अतुलने त्याच्या नोटमध्ये काल होता. माझी सासू आणि मेव्हणा यांनी माझ्याकडून 16 लाख रुपये उधार घेतले होते आणि तरीही ते 50 लाख मागत होते. मी जेव्हा पैसे देण्यास नकार दिला, त्यांनी घाणेराडा खेळ खेळण्यास सुरूवात केली, असा आरोप अतुलने केला.

About Belgaum Varta

Check Also

कायदा सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नाही : गृहमंत्री जी परमेश्वर यांचा इशारा

Spread the love  बेळगाव : पंचमसाली समाजाला लोकशाही मार्गाने शांततेने आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *