
मधुगिरी : जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत पोलिस स्थानकात “रासलीला” केल्याप्रकरणी तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी उपविभागाचे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांना निलंबित करण्यात आले आहे.
जमिनीच्या वादात तक्रार देण्यासाठी आलेल्या पावगड येथील महिलेशी डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी बळजबरीने “रासलीला” केली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
डीवायएसपीचा व्हिडिओ व्हायरल होताच डिजी आयजीपीने डीवायएसपी रामचंद्रप्पा यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला. गृहमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच अशी घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta