बसनगौडा पाटील यत्नाळ; विजयेंद्र यांना आव्हान
बंगळूर : माझी प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी आमच्या गटातून एकमताने उमेदवार म्हणून निवड झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भाजपचे असंतुष्ट नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी जाहीर केले. विद्यामान प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या विरोधातही निवडणुक लढविण्याची तयारी असल्याचे सांगून त्यांना त्यांनी आव्हान दिले.
विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “आमच्या समर्थक उमेदवारांनी आमच्या गटातील एकमत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी माझ्यावर दबाव आणल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, यात शंका नसावी, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. विद्यमान अध्यक्ष विजयेंद्र यांना बदलण्यासाठी अनेकांचा आग्रह आहे.
निवडणुकीची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची इच्छा असेल तर आम्ही निवडणूक लढवू. विजयेंद्र यांच्या विरोधात आम्ही नक्कीच उमेदवार उभा करू, असे ते म्हणाले.
आपल्याला अनेकांचा पाठिंबा असल्याचे विजयेंद्र म्हणाले असावेत. निवडणुका घ्यायच्या नाहीत असा नियम नाही. कोणाकडे बहुमत आहे हे निवडणूक झाल्यावरच कळेल. तोपर्यंत थांबायला सांगा, असे त्यांनी गर्भितपणे उत्तर दिले.
आमच्या गोटातूनच विजयेंद्र बदलण्यासाठी दबाव नाही, तर असे बहुतांश कार्यकर्त्यांचे मत आहे. काळ आणि ऋतू प्रत्येकाचे नशीब ठरवतात. तोपर्यंत सर्वांनी धीर धरावा असे त्यांनी आवाहन केले.