Thursday , March 5 2026
Breaking News

अभिनेत्री रन्याच्या फ्लॅटवरील छाप्यात कोट्यवधीची रोकड, सोने जप्त

Spread the love

 

 

तस्करीच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री पोलिस महासंचालकांची मुलगी

बंगळूर : दुबईतून बेकायदेशीरपणे सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रन्या रावच्या बंगळुर येथील निवासस्थानी बुधवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा टाकला आणि कोट्यवधी रुपयांची मोठी रोकड आणि सोने जप्त केले.
सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या या अभिनेत्रीची झडती घेण्यात आली तेव्हा तिच्याकडे १४.८० किलो सोने असल्याचे आढळून आले. नंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी रन्या यांच्या लव्हेल रोडवरील आलिशान फ्लॅटमधून २.०६ कोटी रुपयांचे सोने आणि २.६७ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्या फ्लॅटसाठी अभिनेत्री ४.५ लाख रुपये भाडे देत होती असे वृत्त आहे.
३२ वर्षीय रन्या राव ही पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे. तथापि, चार महिन्यांपूर्वी अभिनेत्रीचे लग्न झाल्यापासून हे दोघेही संपर्कात नसल्याचे वृत्त आहे.
काही दिवसांपूर्वी डीआरआय अधिकाऱ्यांना दुबईतील सोन्याच्या तस्करीच्या टोळीत एक कन्नड अभिनेत्री सक्रिय असल्याची माहिती मिळाली. दुबईला वारंवार ये-जा करणाऱ्या राण्यावर अधिकारी लक्ष ठेवून होते. गेल्या १५ दिवसांत राण्या राव चार वेळा दुबईला गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने उतरल्यानंतर केम्पेगौडा विमानतळावर अभिनेत्रीला अटक करण्यात आली. अभिनेत्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानात चढल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम बंगळुर विमानतळावर वाट पाहत होती.
अभिनेत्री रन्या तिच्या बेल्ट आणि कपड्यांमध्ये लपवलेल्या सोन्याच्या बारांची तस्करी करण्यासाठी डीजीपीच्या नावाचा वापर करत होती, असे तपास अधिकाऱ्यांनी उघड केले आहे.
विमानतळावर उतरल्यानंतर पोलिस कर्मचारी तिला घेण्यासाठी येत होते. मग ते तिला घरी घेऊन जायचे. सोन्याच्या तस्करीच्या कारवाईत कोणता पोलिस कर्मचारी किंवा आयपीएस अधिकारी सहभागी होता का, याचा तपास डीआरआय आता करत आहे. तिने यापूर्वी सोन्याची तस्करी केली आहे का, याचाही तपास अधिकारी करत आहेत.
अटक केल्यानंतर, तिला चौकशीसाठी बंगळुर येथील डीआरआय मुख्यालयात नेण्यात आले आणि नंतर न्यायालयात हजर करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांनी तिची कोठडी मागितली नसल्याने तिला १८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
चिक्कमंगळुरची रहिवासी असलेल्या रन्याने २०१४ मध्ये किच्चा सुदीप अभिनीत ‘माणिक्य’ चित्रपटातून सँडलवुडमध्ये पदार्पण केले. नंतर, त्यांनी गोल्डन स्टार गणेशच्या ‘पतकी’ चित्रपटात काम केले. याशिवाय रन्याने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *