बेंगळुरू : शिवमोगा येथील बजरंग दलाच्या २३ वर्षीय हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास घ्यावा, असे आवाहन करत याठिकाणी निर्माण झालेल्या तणावाला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलाय. बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या तीन दिवसात शिवमोगा जिल्ह्यात तीन खून झाले असून याची जबाबदारी गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी उचलावी असे त्यांनी सांगितले. मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे दोघेही शिवमोगा जिल्ह्यातील आहेत. याठिकाणी १४४ कलम जारी करण्यात आला असून या सर्व घटनांसाठी मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि खासदार बी. वाय. राघवेंद्र हे जबाबदार असल्याची टीकाही सिध्दरामय्यांनी केली. राज्य सरकारचे प्रायोजकत्व असलेल्या मिरवणुकीत एका मंत्र्यांसमोर दगडफेक, जाळपोळ यासारखे प्रकार घडले असून यावेळी १४४ कलम चे उल्लंघन झाल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. शिवमोगा येथे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल सिद्धरामय्यांनी उपस्थित केला. शिवमोगा येथे झालेल्या घटनेमागे एसडीपीआय, पीएफआय संघटनांचा हात आहे. या संघटनांवर बंदी आणावी, अशी मागणी सिद्धरामय्यांनी केली. शिवमोगा येथे घडलेल्या घटनांमध्ये काही पत्रकारांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकारांसह इतर व्यक्तीही जखमी झाले असून या संपूर्ण घटनेला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप कर ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Check Also
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
Spread the love बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …