नवी दिल्ली : केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राम मोहन नायडू आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट घेऊन उत्तर कर्नाटकातील विमान वाहतूकसंबंधित सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
बेंगळुरूमधील देवनहळ्ळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होत असलेल्या गर्दीमुळे आणखी एक विमानतळ बांधण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. पण बंगळुरूमध्ये लोकसंख्या आणि रहदारी वाढली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड, बेळगाव आदी जिल्हे विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, या जिल्ह्यांमध्येही विमानतळांची सुधारणा करावी, अशी विनंती सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.
विमानतळांच्या दर्जोन्नतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.