बेळगाव : बेळगावचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कर्नाटकचे विद्यमान गुप्तचर अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त हेमंत निंबाळकर यांना आज बुधवारी प्रतिष्ठेचे ‘मुख्यमंत्री पदक’ बहाल करून सन्मानित करण्यात आले.
राजधानी बेंगलोर येथे आज कर्नाटक पोलीस ध्वज दिन दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी कर्नाटकातून नक्षलवादाचे उच्चाटन केल्याबद्दल एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते मुख्यमंत्री पदक प्रदान करून गौरवण्यात आले.