
बंगळूर : बंगळुरच्या चिक्कबानावर येथील रहिवाशी, वरिष्ठ आयपीएस अधिकारी एम. ए. सलीम यांची राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक (डीजी-आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी सलीम यांची नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला.
राज्याचे पोलिस महासंचालक आलोक मोहन ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले आणि त्यांचा कार्यकाळ २१ मे पर्यंत वाढविण्यात आला होता. आलोक मोहन यांनी आज रिक्त केलेले पद सीआयडी डीजीपी डॉ. एम. ए. सलीम हे ज्येष्ठतेच्या आधारावर भरतील. सलीम यांची तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाहक महासंचालक-आयजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२५ जून १९६६ रोजी बंगळुरातील चिक्कबानावर येथे जन्मलेल्या डॉ. एम.ए. सलीम यांनी १९८९ मध्ये वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सलीम यांनी १९९३ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून पोलिस व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि २०१० मध्ये बंगळुर विद्यापीठातून वाहतूक व्यवस्थापनात डॉक्टरेट पदवी पूर्ण केली.
सलीम यांनी १९९३ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून पोलिस व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि २०१० मध्ये बंगळुर विद्यापीठातून वाहतूक व्यवस्थापनात डॉक्टरेट पदवी पूर्ण केली.

Belgaum Varta Belgaum Varta