
बेंगळुरू : बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने ट्रॉफी जिंकल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीच्या जल्लोषाचं रुपांतर दु:खात बदललं आहे. या चेंगराचेंगरीत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये १८ वर्षानंतर आरसीबीने चषक जिंकला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते जमा झाले होते. या स्टेडियमबाहेर लोकांना नीट उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. या स्टेडियमबाहेरच चाहत्यांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.
चेंगराचेंगरीच्या या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta