
सहा जणांची प्रकृती गंभीर
बंगळूर : यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील तिप्पनतागी गावात दूषित पाणी पिऊन तीन जणांचा मृत्यू झाला. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
मृतांची ओळख देविकेम्माहोट्टी (वय ४८), वेंकम्मा (वय ६०) आणि रामण्णा पुजारी (वय ५०) अशी आहे. १० दिवसांपूर्वी दूषित पाणी पिऊन उलट्या आणि जुलाब झाल्याने तिप्पनतागी ग्रामस्थांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारात यश न आल्याने तिघांचा मृत्यू झाला.
७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक जण बरे झाले आहेत, परंतु २० जण अजूनही आजारी आहेत.
सुरपुर तालुका अधिकारी राजवेंकटप्पा यांनी तिप्पनतागी गावाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश बिरादार यांनी उलट्या आणि जुलाब प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta