Wednesday , March 4 2026
Breaking News

चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरण : आरसीबी, कर्नाटक राज्य असोसिएशन विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय

Spread the love

 

बेंगळुरू : रॉयल चॅलेंज बेंगळुरू आयपीएल जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजयोत्सवादरम्यान बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून आरसीबी व्यवस्थापनवर फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

न्यायाधीश डी. कुन्हा आयोगाने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबतचा अहवाल आधीच सादर केला आहे, ज्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा या घटनेचे कारण असल्याचे म्हटले आहे. अहवालात अनेक पैलू देखील स्पष्ट केले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली विधानसौध येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायमूर्ती कुन्हा आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यात आली आणि आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *