
दहावीची पहिली परीक्षा १८ मार्च, बारावीची पहिली परीक्षा २८ फेब्रुवारीला
बंगळूर : दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयुसी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने आज दहावी, बारावी परीक्षा-१ आणि २ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. दहावी परीक्षा २३ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होतील, तर बारावी परीक्षा-१ च्या परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२६ दरम्यान होतील.
२०२६ च्या एसएसएलसी आणि द्वितीय पीयूसी परीक्षा-१ आणि परीक्षा-२ चे अंतिम वेळापत्रक आज (०५ नोव्हेंबर) मंडळाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आले आहे. परीक्षा मंडळाने राज्यातील सर्व पदवी पूर्व महाविद्यालये आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना फलकांवर वेळापत्रक प्रकाशित करण्यास आणि विद्यार्थ्यांना माहिती देण्यास सांगितले आहे.
परीक्षा अशा होतील –
एसएसएलसी परीक्षा-१ १८ मार्च ते २ एप्रिल २०२६
एसएसएलसी परीक्षा-२ १८ मे ते २५ मे
द्वितीय पीयूसी परीक्षा-१ २८ फेब्रुवारी ते १७ मार्च
द्वितीय पीयूसी परीक्षा-२ २५ एप्रिल ते ९ मे
दहावी परीक्षा – १ वेळापत्रक
१८ मार्च (प्रथम भाषा)- मराठी, कन्नड, तेलगू, हिंदी, तमिळ, उर्दू, इंग्रजी, संस्कृत
२३ मार्च – विज्ञान, राज्यशास्त्र, हिंदुस्थानी संगीत, कर्नाटक संगीत.
२५ मार्च (दुसरी भाषा) – इंग्रजी, कन्नड
२८ मार्च – गणित, समाजशास्त्र
३० मार्च (तिसरी भाषा) – हिंदी, कन्नड, इंग्रजी, अरबी, उर्दू, संस्कृत, कोकणी, तुळु, मराठी.
१ एप्रिल – अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकीचे घटक, यांत्रिक अभियांत्रिकीचे घटक,
२ एप्रिल- सामाजिक शास्त्र
दहावी परीक्षा – २ वेळापत्रक
१८ मे -पहिली भाषा: मराठी, कन्नड, तेलगू, हिंदी, तमिळ, उर्दू, इंग्रजी, इंग्रजी (एनसीईआरटी), संस्कृत
१९ मे – विज्ञान, राज्यशास्त्र, हिंदुस्तानी संगीत, कर्नाटक संगीत
२० मे – दुसरी भाषा: इंग्रजी, कन्नड
२१ मे – गणित, समाजशास्त्र
२५ मे – सामाजिक विज्ञान
बारावी परीक्षा १ वेळापत्रक
२८ फेब्रुवारी- कन्नड, अरबी
२ मार्च -भूगोल, मानसशास्त्र, अंकशास्त्र.
३ मार्च- इंग्रजी.
४ मार्च- तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच.
५ मार्च- इतिहास.
६ मार्च -भौतिकशास्त्र
७ मार्च -पर्यायी कन्नड, व्यवसाय अभ्यास, भूगर्भशास्त्र
९ मार्च – रसायनशास्त्र, अध्यापनशास्त्र, बीजगणित.
१० मार्च- अर्थशास्त्र.
११ मार्च- तर्कशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गृहशास्त्र.
१२ मार्च- हिंदी.
१३ मार्च -राज्यशास्त्र
१४ मार्च- अकाउंटिंग, गणित,
१६ मार्च – समाजशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान.
१७ मार्च – हिंदुस्थानी संगीत, ऑटोमोबाइल, आरोग्यसेवा, सौंदर्य आणि कल्याण.
बारावी परीक्षा २ वेळापत्रक
२५ एप्रिल : कन्नड, अरबी
२७ एप्रिल : पर्यायी कन्नड, तर्कशास्त्र, गणित, जीवशास्त्र
२८ एप्रिल : राज्यशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान, संगणक विज्ञान
२९ एप्रिल : गणित, गृह गणित, मूलभूत विज्ञान
३० एप्रिल : अर्थशास्त्र
२ मे : इतिहास, रसायनशास्त्र
४ मे : इंग्रजी
५ मे: हिंदी
६ मे : व्यवसाय अभ्यास, भौतिकशास्त्र, शिक्षण.
७ मे : समाजशास्त्र, सांख्यिकी
८ मे : मानसशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र
९ मे : तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उर्दू. संस्कृत, फ्रेंच.
Belgaum Varta Belgaum Varta