

कलबुर्गी : वरिष्ठ आयएएस अधिकारी व कर्नाटक राज्य खनिज निगमचे व्यवस्थापकीय संचालक महांतेश बिळगी यांचे आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाह समारंभासाठी विजयपूरहून कलबुर्गीकडे जात असताना जेवर्गी तालुक्यातील गौनळी क्रॉसजवळ महामार्गावर ही दुर्घटना घडली. अचानक रस्त्यावर आलेल्या श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने केए 04 एनसी 7982 क्रमांकाची इनोवा कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण अपघातात महांतेश बिळगी यांचे बंधू शंकर बिळगी व ईरन्ना शिरसंगी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत आयएएस महांतेश बिळगी यांना कलबुर्गीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनामुळे कर्नाटक प्रशासन, सहकारी, अधिकारीवर्ग आणि समाजात मोठी हानी झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta