

लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभाग
बंगळूर : भारताला शांतता कशी राखायची आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे हे माहित आहे, असे पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २८) सांगितले. युद्धभूमीवर भगवद्गीतेचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख करत पंतप्रधानानी, शांतता राखण्यासाठी आणि सत्याचे समर्थन करण्यासाठी अत्याचाऱ्यांना नष्ट करण्याची गरज व्यक्त केली.
दहशतवादी हल्ल्यांनंतर मागील सरकारे योग्य प्रतिसाद देण्यास कचरत होती. परंतु नवीन भारत आपल्या लोकांचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे, कोणासमोरही झुकणार नाही किंवा मागेपुढे पाहणार नाही, असे पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले.
आज उडुपी येथील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मागील सरकारे दहशतवादी हल्ल्यांनंतरही शांत बसून राहायची. परंतु नवीन भारत आपल्या लोकांचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे आणि कोणासमोरही झुकणार नाही किंवा मागेपुढे पाहणार नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जमीन, जलसंवर्धन आणि जीवनमूल्य जपण्याचे नवीन नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले. उडुपी येथील श्रीकृष्ण मठात आयोजित लक्ष-कंठ गीता पठण कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी हा संदेश दिला. वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे संकल्प अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
मोदींचे नऊ संकल्प
कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या नव्या संकल्पांमध्ये पाणी वाचवा, झाडे लावा, आईच्या नावाने वृक्षारोपण मोहीम सुरू करा, किमान एका गरीब व्यक्तीचे जीवन सुधारा, स्वदेशी स्वीकारा – ‘स्वर-स्थानिक’ मंत्र आत्मसात करा, नैसर्गिक शेती अवलंबा, योगाचा स्वीकार करा, योगी जीवनशैली अंगीकारा, प्राचीन हस्तलिखितांचे जतन करा, देशातील किमान २५ पवित्र स्थळांना भेट द्या यांचा समावेश आहे. या संकल्पांचे जतन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
२०४७ च्या अमृत काल ध्येयपूर्तीसाठी सर्व भारतीयांनी कर्तव्यनिष्ठ राहण्याचे आवाहन करत, विकसित कर्नाटक, विकसित भारताचा संकल्प आपण सर्वांचा असला पाहिजे,असे ते म्हणाले.
उडुपीत ‘जय श्री कृष्ण’ ने सुरुवात
“सर्वांना नमस्कार” म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली आणि नंतर “जय श्री कृष्ण” असा नारा दिला. लक्षकंठ गीता पठण अभियानाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी यांचे अभिनंदन केले. हे अभियान सनातन संस्कृतीचे संवर्धन असल्याचे त्यांनी नमूद केले.
जगद्गुरू मध्वाचार्यांच्या पवित्र परंपरेपासून उडुपीमध्ये चालत आलेल्या वेदानंद साधनेचेही त्यांनी कौतुक केले. लाखो भक्तांना चालणाऱ्या अन्नदान सेवेचा उल्लेख करत त्यांनी उडुपीला “भक्ती आणि अध्यात्माचा संगम तीर्थ” असे संबोधले.
कनकदास, दासपरंपरेचा गौरव
कनकदासांच्या भक्तीपरंपरेचा विशेष उल्लेख करत मोदी म्हणाले की, भगवद्गीतेतील “सर्व जन सुखाय – सर्व जन हिताय” हा संदेशच ‘सबका साथ, सबका विकास’च्या केंद्रस्थानी आहे.
धर्मरक्षणासाठी दुष्कर्म्यांचा अंत करणे आवश्यक असल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत, देशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मोदींना “भारत भाग्यविधाता” सन्मान
कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींना “भारत भाग्यविधाता” हा मानद तिरुपदी सन्मान प्रदान करण्यात आला. पर्याय पुट्टीगे मठाचे अध्यक्ष सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी यांनी हा सन्मान देत, उडुपीतही काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य उडुपी कॉरिडॉर उभारण्याचे आवाहन केले.
Belgaum Varta Belgaum Varta