
बेंगळुर : दिल्ली आणि इतर राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बुधवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, दिल्लीसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सावधगिरी बाळगण्यास सुरवात केली आहे. हॉस्पिटल्समध्ये बेड्सची संख्या, सज्जता तपासण्याची सूचना अधिकार्यांना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सक्तीने मास्क घालण्याची सूचना करण्यात आली आहे. अलीकडे सभा-समारंभांत लोकांनी मास्क घालणे सोडून दिले आहे. ते घालण्याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी. त्याचप्रमाणे सरकारने राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आवश्यक पावले उचलली असून, लोकांनीही सावधगिरी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.
एकंदर कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारने राज्यात आवश्यक पावले उचलली असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी यावेळी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta