Saturday , October 19 2024
Breaking News

कर्नाटकात ‘आप’ तिसरे सरकार स्थापन करेल : अरविंद केजरीवाल

Spread the love


बेंगळूर : दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्ष दक्षिणेकडील राज्य कर्नाटकात तिसरे सरकार स्थापन करेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते गुरुवारी कर्नाटकात आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक मोहिमेला सुरुवात करताना बोलत होते.
नॅशनल कॉलेजच्या मैदानावर झालेल्या रॅलीत बोलताना केजरीवाल यांनी कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने भाजप सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ घेऊन “40% सरकार” पाडण्यासाठी शेतकरी संघटनांचा पाठिंबा मागितला. “आम्हाला या सरकारांचे 20% आणि 40% कमिशन खाते बंद करावे लागेल,” असे सांगताना केजरीवाल म्हणाले की, कोणतेही भ्रष्टाचारमुक्त सरकार लोकांना अनेक सेवा विनामूल्य देऊ शकते.
“गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तरीही, दिल्लीतील लोकांसाठी पाच गोष्टी मोफत पुरवल्या जातात- शिक्षण, आरोग्यसेवा, वीज, पाणी आणि महिलांसाठी दळणवळणाच्या सोई” या गोष्टी त्यांनी कशा केल्या हे सांगताना ‘आमचे सरकार प्रामाणिक आहे. त्यामुळे सरकारचे पैसे वाचवतात,” असे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

Spread the love  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *