Saturday , October 19 2024
Breaking News

मंगळुरू येथे मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष!

Spread the love


प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन
मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरु येथील एका मशिदीच्या डागडुजीच्या कामाकाजाच्या वेळी मशिदीखाली हिंदू मंदिर सदृश्य असे काही अवशेष सापडले आहेत. मंगळुरुपासून काही अंतरावर असणार्‍या या मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याची बातमी वार्‍यासारखी परसरली असून हा सारा प्रकार गुरुवारी समोर आल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेने दिली.
मिलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरु आहे. यानिमित्त सुरु असणार्‍या खोदकामादरम्यान हे अवशेष सापडलेत. मशिदीचे व्यवस्थापन पाहणार्‍या समितीच्या पुढाकारानेच हे काम केले जात होते. हे अवशेष सापडल्यामुळे आता पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होते असा दावा केला जातोय. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणच्या काम थांबवण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली.
दरम्यान दक्षिण कानडा जिल्ह्याच्या आयुक्तांनी या अवशेषांची काळजी घेण्याचे आणि ते आहे तसेच जतन करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने तातडीने या जमीनीसंदर्भातील कागदोपत्री पडताळणी सुरु केली असून लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
मला त्या ठिकाणी काम करत असणार्‍या अधिकार्‍यांकडून आणि पोलिसांकडून यासंदर्भात माहिती मिळाली. या जमिनीची मालकी कोणाकडे होती आणि ती कशी हस्तांतरित होत आली याची पहाणी सध्या जिल्हा प्रशासन करत आहे. आम्ही दोन्ही खात्यांकडून म्हणजेच जमीनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वफ्फ बोर्डाकडून माहिती घेणार आहोत, असं दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी स्पष्ट केले.
सध्या केल्या जाणार्‍या दाव्यांची पडताळणी करुन आम्ही यासंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ. तोपर्यंत आम्ही या अवशेषांची काळजी घेण्याचे निर्देश दिले असून लोकांनी कोणताही अर्थ यामधून काढू नये असे आवाहन करतो. लोकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, असे अधिकार्‍यांनी म्हटल आहे.

About Belgaum Varta

Check Also

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

Spread the love  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *