
हुबळी : हुबळी दंगल पूर्वनियोजित कट होता. हिंदू समाजाला घाबरविण्याच्या उद्देशाने हुबळी येथील गोंधळाला दंगलीचे स्वरूप देण्यात आले. सरकारने याप्रकरणी दंगलखोरांसंदर्भात पुरुषार्थ दाखवावा, असा टोला श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी लगावला.
जुन्या हुबळी येथील दंगलीतील दिड्डी हनुमंत देवस्थान आणि पोलीस स्थानकाला आज प्रमोद मुतालिक यांनी भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुतालिक म्हणाले, हुबळी येथे झालेल्या दंगलीला पोलिसांनी योग्यप्रकारे हाताळले आहे. पोलिसांच्या या कार्याचे आपण कौतुक करत याप्रकरणी अल्ताफ हळळूर, अल्ताफ कित्तूर यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.
दंगलखोरांवर सरकार दरबारी कारवाई करण्यास विलंब होत असल्याने सरकारने दंगलखोरांवर कोका कायद्यांतर्गत कारवाई, या घटनेत रझा अकादमी संघटनेचाही हात असून यासंदर्भात सरकारने पुरुषार्थ दाखवून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी असे प्रकार सहन करण्याजोगे नसून काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थितीत राज्यात अनुभवयाला मिळत असल्याचेही मुतालिक म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta