
बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बेंगळुरू येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांपासून जेडीएसशी असलेले घट्ट नाते तोडून त्यांनी जेडीएसला अलविदा केले आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, महसूल मंत्री आर.अशोक, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून होरट्टी भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधीलच काही नेत्यांनी गुप्तपणे विरोधही केला होता. त्यावर संयम पाळत होरट्टी यांनी प्रतिक्रियाही दिली होती. अखेर आज अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीएसला अलविदा करत भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करून सर्व चर्चांवर पडदा पाडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta