Saturday , October 19 2024
Breaking News

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच निर्णय

Spread the love


मुख्यमंत्री बोम्मई, उपमुख्यमंत्रिपदावर मुख्यमंत्र्यांचे मौन

बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळाचा विस्तार कि पुनर्रचना याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय लवकरच कळविणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी येथे दिली.
शाह मंगळवारी शहरात असताना मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल यावर काही चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीला गेल्यावर माझ्याशी याबद्दल बोलू असे त्यांनी सांगितले असल्याचे बोम्मई म्हणाले.
मंत्रिमंडळात पक्ष उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचा विचार करणार का, या वृत्ताला बोम्मई यांनी प्रतिसाद दिला नाही. ते म्हणाले, मला तुमच्याकडूनच (मीडिया) याबाबत जाणून घ्यायचे आहे.
शहा मंगळवारी शहरात होते, त्यादरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि बोम्मई यांच्या अधिकृत निवासस्थानी दुपारच्या जेवणाला हजेरी लावली, जिथे ते निवडक राज्य भाजप नेत्यांसोबत होते. ते (शहा) माझ्याशी दिल्लीला गेल्यावर या विषयावर बोलतील.
२०२३ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी नेतृत्वातील संभाव्य बदल आणि मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार करण्याच्या दबावादरम्यान शहा यांचा शहराचा दौरा झाला.
भाजपच्या अनेक नेत्यांनी बोम्मई यांच्या बदलीबाबतच्या अटकळांचे खंडन केले आहे. भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनी बोम्मई यांना विकास आणि निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आणि बाकीचे पक्ष नेतृत्वावर सोडण्यास सांगितले.
मंत्रिमंडळात वरपासून खालपर्यंत फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू असताना, मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता मंत्रिपदाच्या इच्छुकांना वाटत आहे, अनेक पदाधिकार्‍यांना नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाटते.
दरम्यान, ५ मे रोजी होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ११ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १० मे पूर्वी भाजप हायकमांड या संदर्भात निर्णय घेईल अशी अपेक्षा असल्याच्या वृत्तादरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी किंवा त्यात फेरबदल करण्यासाठी स्थगिती दिली जाऊ शकते, अशा अटकळांना यामुळे चालना मिळाली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांपूर्वी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल करण्याचा इच्छुकांकडून बोम्मई यांच्यावर दबाव आहे.
राज्य मंत्रिमंडळात सध्या पाच पदे रिक्त आहेत, ज्यात मुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत, कर्नाटक मंत्रिमंडळात एकूण ३४ जणाना संधी मिळू शकते. काही आमदार तर विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी कर्नाटक मंत्रिमंडळात लवकरच गुजरातप्रमाणे फेरबदल करण्याचा सल्ला देत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

Spread the love  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *