बेंगळुरू : देशात ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. यादरम्यान कर्नाटकातील मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना सापडल्याची घटना घडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.
खोदकामादरम्यान सापडली वास्तू
२१ एप्रिल रोजी मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. मशिदीचा काही भाग आधीच पाडून नूतनीकरणाचे काम मशिदीच्या अधिकाऱ्यांकडून केले जात होते. काही गटांच्या मते, मशीद बांधण्यापूर्वी या ठिकाणी मंदिर अस्तित्वात होते. कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta