नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे. यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदारसंघातून बसवराज होरटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta