बेंगळुर : कावेरीच्या पाणी वाटपावरून तमिळनाडू काही तरी कुरापत काढून राजकीय स्टंट करत आहे. मात्र मेकेदाटू योजनेला कसलाही कायदेशीर अडथळा नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मेकेदाटू योजनेसंदर्भात कावेरी नदी देखरेख मंडळाकडे डीपीआर मंजुरीसाठी अनेक बैठक झाल्या आहेत. लवकरच अंतिम बैठक होणार आहे. त्यामुळेच तमिळनाडू काहीतरी कुरापत काढत आहे. म्हणून त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्या पत्राची प्रत मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांची मागणी बेकायदेशीर आणि लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात आहे. आमच्या वाट्याचे पाणी पळविण्याचा डाव तमिळनाडूने आखला आहे असे बोम्मई म्हणाले.
तमिळनाडूच्या हक्काचे पाणी घेण्यासाठी आम्ही मेकेदाटू योजना राबवत नाहीय. आमच्या हक्काच्या पाण्यावर आम्ही ही योजना आणत आहोत. याबाबत 15 हुन अधिक बैठक झाल्या आहेत. आता नकोत आक्षेप तमिळनाडू घेत आहे. कावेरीच्या पाण्याच्या मुद्द्यावर ते नेहमीच स्टंट करतात. अनेक वर्षे यावर ते राजकारण करत आले आहेत. मात्र या योजनेने कायद्याच्या कोणत्याही चौकटीचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय बांधकाम विभागाला आम्ही योजनेचा अहवाल सादर केला आहे. ही योजना आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणी आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असे बोम्मई यांनी सांगितले.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/06/14-6.jpg)