बंगळुरू : जीएसटी मंत्री परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्याच्या उद्देशाने आज दिल्लीला जात आहे. कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना भेटणार नाही असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बंगळुरू येथील आरटी नगरातील निवासस्थानी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांची बैठक आज दिल्लीत होत आहे. त्यात सहभागी होऊन संध्याकाळी परत येणार आहे. एक टीव्हीशी संबंधित कार्यक्रम असल्यामुळे मी दिल्लीला निघालो आहे. वेळेच्या कमतरतेमुळे वरिष्ठ नेत्यांना भेटणे अशक्य आहे. त्यामुळे वरिष्ठांशी भेट किंवा चर्चा करणार नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या बंगळुरूमध्ये येणार आहेत. त्यामुळे दिल्लीत कोणत्याही नेत्यांना भेटणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta