मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकार्यांना सूचना
बेंगळुर : राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आधी बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई देण्याच्या सूचना राज्यातील जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
बंगळुरात बुधवारी अतिवृष्टीने होणार्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकार्यांना काय सूचना केल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, या संदर्भात जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली आहे. आधी बचाव मोहीम हाती घेऊन मग भरपाई देण्याची सूचना केली आहे. राज्याच्या करावळी आणि पूर्व भागात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अजूनही सतत पाऊस होत आहे. त्यामुळे अतिवृष्टीने आणखी नुकसान झाल्यास आधी बचाव कार्य हाती घेण्यास सांगितले आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. बचावकार्य संपताच तातडीने भरपाईही देण्याचे अधिकार्यांना निर्देश दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta