Monday , September 21 2026
Breaking News

मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी विलास अध्यापक

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विलास अध्यापक यांची निवड एकमताने करण्यात आली. तसेच उपाध्यपदी महेश काशीद, कार्यवाह म्हणून शेखर पाटील, सहकार्यवाह म्हणून गुरूनाथ भादवणकर व सुहास हुद्दार यांची परिषद प्रतिनिधी म्हणून फेरनिवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2022-23 सालासाठी नूतन पदाधिकार्‍यांची ही निवड झाली. अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते. सदानंद सामंत, राजेंद्र पोवार यांची यावेळी नूतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. तसेच प्रकाश माने यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कार्यकारिणीच्या जागेवर परशराम पालकर यांची नियुक्ती करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *