बेंगळुर : अमरनाथ यात्रेत राज्यातील 100 हून अधिक कन्नडिग सहभागी झाले असून ते सुरक्षित आहेत. आम्ही तिथल्या राज्य सरकारच्या सतत संपर्कात आहोत आणि बचावकार्य सुरू आहे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमधील त्यांच्या आरटी नगर निवासस्थानी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील नागरिकदेखील दरवर्षी अमरनाथ यात्रा करतात. प्राथमिक माहितीनुसार या यात्रेत यंदा राज्यातील 100 हून अधिक जणांचा सहभाग आहे. इतर कोणत्याही अनुचित घटनेची नोंद नाही. आम्ही तेथील राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. आधीच 15 जणांनी फोन करून मदतीला येण्यास सांगितले आणि लोकेशनही सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार आणि लष्कर आधीच बचाव कार्यात गुंतले आहे. आमचे मुख्य सचिव आधीच केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत असे ते म्हणाले.
राज्यातील पाऊस आणि मदत कार्याविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यांतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांसोबत काल व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta