बेळगाव : हिंदू कायद्यानुसार दुसरे लग्न होऊ शकत नाही, मी तिच्याशी लग्न केलेले नाही, असे म्हणत फलोत्पादन खात्याचे अधिकारी राजकुमार टाकळे हे माझे पती आहेत, असा नवा बॉम्ब फोडणार्या काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर राजकुमार टाकळे यांनी पलटवार केला आहे.
काँग्रेस नेत्या नव्यश्री यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणारे उद्यान विभागाचे अधिकारी राजकुमार टाकळे यांनी आज, बुधवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण दिले. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मला मानसिक त्रास देत आहे. माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबियांनी, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही काळजी करू नका. असे सांगितल्याने मी काल एफआयआर दाखल केला आहे. पोलीस योग्य तपास करतील आणि मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे. सत्य आज ना उद्या कळेल, मी सरकारी अधिकारी असल्याने फार काही बोलता येत नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. आधी मी तिचा नवरा असल्याचा दावा नव्यश्रीने केला होता. त्यानंतर पैशासाठी ती हे करत असल्याचे स्पष्ट झाले. मला ब्लॅकमेल करून तिने दोन लाख रुपये काढून घेतले आहेत असे टाकळे यांनी सांगितले.
हिंदू कायद्यानुसार दुसरा विवाह होऊ शकत नाही. मी विवाहित आहे हे माहित असूनही नव्यश्री अशी वागल्याचे तक्रार मी दिली आहे. ऑडिओमध्ये तिने ती माझी पत्नी असल्याचे म्हटलेले नाही. तिच्या घरात अडचण असल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून आमच्या समाजाची मुलगी म्हणून मी तिला माझ्या घरी राहायला सांगितले, तेव्हा मोबाईलवर बोलत असताना माझी पत्नीसुद्धा माझ्या शेजारी होती. हे मी माझ्या पत्नी आणि मुलीलाही सांगितले आहे. माझी पत्नी आणि मुले माझ्यासोबत आहेत, माझ्यासाठी हे पुरेसे आहे, आता माझा कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल, असा विश्वास राजकुमार टाकळे यांनी व्यक्त केला. माझ्या पत्नीने मला मानसिक आधार देऊन सहकार्य दिल्यानेच मी एफआयआर नोंदवला. चला व्हिडिओसह सर्वकाही तपासून होऊ दे, नंतर तुम्हाला सर्व सत्य समजेल.