Sunday , July 26 2026
Breaking News

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी : शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

बेळगाव : लेंडी नाला व बेळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढून नाला पूर्णपणे स्वच्छ करावा तसेच पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लेंडी नाला व बेळ्ळारी नाला वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित आहे. अनेकदा मागणी करून देखील या नाल्याची साफसफाई करण्याची तसदी स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या दोन्ही नाल्यांमध्ये जलपर्णी वाढलेली आहे. नाल्यामध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे पावसाळ्यात बेळगाव ते मुचंडी पर्यंतची शेकडो एकर शेती पाण्याखाली जाते आणि या भागातील शेतकर्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याची दखल घेऊन बेळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची सफाई करण्याचे काम हाती घेण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी एक निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे तसेच संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना पाठवून देण्यात आले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, अर्जुन सावंत, तानाजी सावंत, दीपक साबन्नावर, परिश जिनगौडर, मारुती सावंत, युवराज सावंत, सुनील जाधव, दीपक पाटील, दीपक पडवळकर, मारुती सावंत आदी शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *