कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील यालबुर्गा तालुक्यातील भानापुर गावात अज्ञात वाहनाने स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. देवप्पा कोप्पड (62), त्यांची सून गिरिजम्मा कोप्पड (45), शांतम्मा (35), पर्वतम्मा (32), कस्तुरम्मा (20) यांचा मृत्यू झाला. हे सर्व बिन्नळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत.
स्कॉर्पिओमधून एकूण 9 जण प्रवास करत होते. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना कोप्पळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोप्पळ येथील एका खासगी कार्यक्रमासाठी हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना लॉरीची स्कॉर्पिओला धडक बसून अपघात घडला.
कुकनूर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.
Belgaum Varta Belgaum Varta