Wednesday , December 10 2025
Breaking News

आणखी एका संशयित दहशतवाद्याला तमिळनाडूत अटक

Spread the love

सीसीबी पोलिसांची कारवाई, दहशतवादी अख्तरच्या चौकशीतून माहिती समोर

बंगळूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहाद युद्ध भडकविण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याने दिलेल्या माहितीवरून तामिळनाडूमध्ये आणखी एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी बंगळूरात आणण्यात येत आहे.
सीसीबी पोलिसांनी रविवारी रात्री बंगळुरमधील टिळक नगर येथे राहणारा संशयित दहशतवादी अख्तर हुसैन लष्कर याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आसामचा अख्तर हा टिळक नगरमधील एका बहुमजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात राहत होता. त्याच्यासोबत फूड डिलिव्हरी बॉईजही होते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला संशयिताची माहिती मिळाली होती. सीसीबी पोलिसांनी कारवाई करत रात्री घरावर छापा टाकून संशयित दहशतवाद्याला अटक केली.
दहशतवादात गुंतलेला अख्तर उत्तर भारतातून पळून बंगळुरमध्ये स्थायिक झाला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतरच अधिक माहिती मिळेल, असे सीसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित अतिरेक्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, आनखी एका संशयिताला तमिळनाडूमध्ये अटक करण्यात आली. सोशल मीडियाद्वारे जिहाद युद्ध भडकवण्याच्या आरोपाखाली त्याला तमिळनाडूत अटक करण्यात आल्याचे समजते. त्याला चौकशीसाठी बंगळूर शहरात आणण्यात येत आहे.
आसामचा अख्तर हुसेन २०२० मध्ये टिळक नगरमध्ये राहत होता. नुकताच तो डिलिव्हरी बॉयच्या नोकरीत रुजू झाला. यापूर्वी तो एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाला होता आणि विविध व्यवसायात ते कार्यरत होते. तो तामिळनाडूतील जुबा नावाच्या आणखी एका संशयित अतिरेक्याच्या संपर्कात होता. दोघेही आसाममधील आहेत. तो अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांच्या संपर्कात होता, असे सांगण्यात येत आहे. अख्तरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे, सीसीबीने आणखी एक विशेष टीम ऑपरेशन राबवून संशयिताला तामिळनाडूतील सेलम येथून अटक करून शहरात आणले.
सोशल मीडियातील ऑपरेशन
फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम या सोशल मीडियासह अनेक पर्यायी माध्यमांद्वारे ग्रुप तयार करण्यात आला. भारतात मुस्लिमांची उपेक्षा आहे. आमची संपत्ती टिकवायची असेल तर धर्माशी लढा द्यावा लागेल, अशा गप्पा तो ग्रुप सदस्यांशी बोलत होता. अप्रत्यक्षपणे हिंसक कृत्यांमध्ये गुंतण्यासाठी त्याना प्रवृत्त करीत होता. हे तरुण कोलकाता आणि चेन्नई येथील ग्रुपचे सदस्य होते. त्याने गटातील सदस्यांशी जिहाद संघर्षाबाबत गप्पा मारल्याची माहिती आहे. अनेकजण कट्टरतावाद्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते.
अख्तरला पोलिस कोठडी
सोशल मीडियावर ग्रुपने तयार केलेल्या माहितीच्या आधारे तेलंगणा पोलिसांनी सीसीबीच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीसी) बंगळुरमध्ये संशयित दहशतवादी उपस्थित असल्याची माहिती दिली. सध्या त्याला ५० व्या सीसीएच न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी करण्यात आली. एनआयए, आयबी आणि आयएसडीचे अधिकारी चौकशीसाठी तयार आहेत.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी तालीब हुसेन नावाच्या संशयित दहशतवाद्याला ओकलीपूरमध्ये अटक केली होती.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *