Wednesday , March 4 2026
Breaking News

प्रेम प्रकरणातून धार्मिक हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Spread the love

 

कोप्पळ : कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील हुलीहायडर गावात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाशा वाली (22) आणि येनाकापा तलवाड (60), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका हिंदू मुलाचे मुस्लीम मुलीवर प्रेम होते. मोहरमच्या एका कार्यक्रमादरम्यान मुलगा मुलीला भेटायला गेला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. याची माहिती दोघांच्या घरच्यांना मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी दाखल झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने यावेळी हाणामारीही झाली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *