बेंगळुरू : भाजपा आमदार के. एस. ईश्वरप्पा यांनी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर ईश्वरप्पा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये त्यांना जर पुन्हा टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू असे धमकावण्यात आले आहे. हे पत्र त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यदिनी टिपू सुलतान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेले बॅनर लागल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपण सर्व मुस्लीम गुंड असल्याचे म्हटलेले नसून, आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचे सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta