Wednesday , March 4 2026
Breaking News

हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला कॉलेजमध्ये बेदम मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Spread the love

बेंगलोर : सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच कॉलेजमधील इतर तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे बंगळुरूमधील हुबळी धारवाड इदगाहमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातली वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असताना दुसरीकडे कर्नाटकमधील हा प्रकार घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

एएनआयनं पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मोहम्मद सनिफ या तरुणाने सुलिया नावाच्या एका हिंदू तरुणीशी मैत्री केल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीसंदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिक्षित, धनुष, प्रज्वस, थनुज, अक्षय, मोक्षित, गौतम अशी यातल्या काही तरुणांची नावं तक्रारीमध्ये देण्यात आली आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *