Sunday , July 26 2026
Breaking News

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी अपघातातून बचावले

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी-हिडकलजवळ माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची कार घटप्रभा डाव्या कालव्यात पलटी होऊन भीषण अपघात झाला.

अथणीहून बेळगावला जात असताना माजी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला दुचाकीची होणारी धडक टाळण्यासाठी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घटप्रभाच्या डाव्या कालव्यात पलटी होऊन कारमधील प्रवासी लक्ष्मण सवदी हे जखमी झाले.
जत- जांबोटी राज्य महामार्ग 31 वर हा अपघात झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमी लक्ष्मण सवदी यांना रायबाग रुग्णालयात दाखल करण्यात आले, सुदैवाने सवदी यांच्या जीवितास कोणताही धोका नसून किरकोळ जखमी होऊन ते बचावल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *