अंकली (प्रतिनिधी) : राज्यात कोणी पेमेंट मुख्यमंत्री असेल तर ते सिद्धरामय्याच होते, राज्यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या वाढीला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केला. नलिनकुमार कटील यांनी मंगळवारी विजापुरातील सिद्धेश्वर आश्रमाला भेट दिली.
या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या यांच्यामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या वाढीला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार आहेत. सिद्धरामय्या यांच्या काळात देशविरोधी संघटना वाढल्या आहेत. आमच्या सरकारने आता ठोस निर्णय घेतला आहे. एनआयएने देशभर छापे टाकून देशविरोधी कृत्यांत गुंतलेल्या पीएफआय आणि एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली आहे. त्यातही आमच्या राज्यातील सर्वाधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी देशभरातुन होत आहे. त्यासाठी पुरावे गोळा करून
कठोर कारवाईबरोबरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta