Tuesday , March 3 2026
Breaking News

कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण विभागास 100 कोटी रुपयांचा निधी

Spread the love

 

 

बेंगळुरू : येत्या 10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येथे या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात बसवराज बोम्मई सरकार काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रसोबतचा सीमावाद चिघळलेला असताना बोम्मई यांनी सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण विभागास 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात तशी कतरतूद करण्यात येईल, असे बोम्मई म्हणाले आहेत.
बोम्मई यांनी कर्नाटकच्या सीमाभागात शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकास व्हावा यासाठी सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे सांगितले. हे 100 कोटी रुपये सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण विभागाला देण्यात येतील. या निधीच्या माध्यमातून सीमाभागात शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करण्यात येईल. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्देशही बसवराज बोम्मई यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.
सीमाभागातील विकासासाठी 100 कोटींची तरतूद
याआधीच सीमा सुरक्षा प्राधिकरणाला 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आता आणखी 100 कोटी रुपये दिले जातील. आगामी अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल. सीमाभागात राहणार्‍या नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे बसवराज बोम्मई म्हणाले.
सीमाभागात राहणार्‍या कानडी लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही : बोम्मई
सर्वात अगोदर आपण सीमाभागाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सीमाभागात राहणार्‍या कानडी लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकार या भागातील लोकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवत आहे. अगोदर सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला 8 ते 10 कोटी रुपये दिले जायचे. आता मात्र या निधीत वाढ करण्यात आली आहे, असेही बोम्मई म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *