बंगळूर : पुढील आठवड्याच्या शेवटी (ता. २५), पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यात येत आहेत. ते दावणगेरे, चिक्कबळ्ळापूर आणि बंगळुर येथे विविध कामे आणि प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्याच निमित्ताने बंगळुरमध्ये भव्य रोड शो होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शनिवारी (ता. २५) सकाळी दिल्लीहून थेट बंगळुरला पोहोचतील, बहुप्रतिक्षित केआरपुरा-व्हाइटफिल्ड मेट्रो सेवेला हिरवी झेंडी ददाखवतील. याआधी ते व्हाईटफिल्डमध्ये महादेवपूर मतदारसंघातील सत्यसाई आश्रम ते व्हाईटफिल्ड मेट्रो स्टेशनपर्यंत सुमारे एक किमीचा रोड शो करणार आहेत.
मोदींनी यापूर्वीही राज्यातील बेळगाव आणि मंड्यामध्ये रोड शो केले होते. उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर पंतप्रधान मोदी बंगळुरमध्येही रोड शो करणार आहेत. रोड शोचा मार्ग अद्याप अंतिम झालेला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta