मुख्यमंत्री बोम्मईंचे भाकीत, काँग्रेसकडे योग्य उमेदवार नसल्याचा दावा
बंगळूर : काँग्रेसकडे सुमारे ६० जागांवर योग्य उमेदवार नाहीत. परिणामी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा वाईट कामगिरी करत पक्षाचा पराभव होईल, अशी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी टिप्पणी केली.
ते म्हणाले की, काँग्रेसकडे केवळ उमेदवारच नाहीत, तर राज्यात त्याना फारसा आधारही नाही. कॉंग्रेसला आपल्या धोरणांबाबत स्पष्टता नाही. बोम्मई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, “माझ्या समजुतीनुसार, काँग्रेसकडे सुमारे ६० जागांवर योग्य उमेदवार नाहीत, म्हणून ते इकडून-तिकडून लोक मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
“मी आधी म्हटल्याप्रमाणे, काँग्रेसची दुसरी यादी तयार करताना डी. के. शिवकुमार यांनी आमच्या जवळपास सर्व आमदारांशी संपर्क साधला, ‘तुमच्यासाठी जागा राखून ठेवल्या आहेत, तुम्ही सहभागी व्हाल का? अशी त्यांनी विचारणा केल्याचे ते म्हणाले.
शिमोगा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि शिवकुमार धाडसाने बोलतात, पण आतील वास्तव वेगळे आहे.
“गेल्या वेळेपेक्षा त्यांचा दारूण पराभव होईल, यात शंका नाही, कारण त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, आधार नाही, धोरणांबाबत स्पष्टता नाही – मग ते आरक्षण असो की विकासाबाबत. त्यांना वाटते, की बेफिकीरपणे बोलून ते निवडणूक जिंकू शकतील, पण ते शक्य नाही,’ असेही ते म्हणाले.
बोम्मई यांनी अलीकडेच शिवकुमार यांच्यावर भाजपच्या आमदारांना फोन करून काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघात तिकीट देऊ केल्याचा आरोप केला होता.
केपीसीसी प्रमुखांनी त्यांच्या बाजूने यावर प्रत्युत्तर दिले, भगव्या पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस आमदारांचे “दार ठोठावले” आणि २०१९ मध्ये पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली हे सुनिश्चित केले.
काँग्रेसने एकूण २२४ जागांपैकी १६६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून, उर्वरित५८ जागांसाठी अद्याप यादी निश्चित केलेली नाही. काँग्रेस सत्तेत आल्यावर भाजप सरकारचे आरक्षणासंबंधीचे निर्णय रद्द करेल, या शिवकुमार यांच्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “त्याना करू द्या, बघू… ते शक्य नाही.