Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटकमध्ये अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद?

Spread the love

 

बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला चारी मुंड्या चीत केले आहे. येथे काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळविला असून बहुमताचा आकडा पार केला आहे. कर्नाटकात एकहाती सत्ता आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदीआनंद आहे. तर येथे भाजपाला अवघ्या 66 जागांवर विजय मिळवू शकला आहे. दरम्यान, ही निवडणूक काँग्रेसने जिंकल्यानंतर येथे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सूतोवाच केले आहे. काँग्रेस येथे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दोन बड्या नेत्यांमध्ये विभागून देण्याची शक्यता आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले संकेत
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील दोन बडे नेते आहेत. राज्यभर त्यांचा चांगलाच दबदबा आहे. किंबहुना या दोन्ही नेत्यांनी कसून मेहनत केल्यामुळेच काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळू शकला आहे. असे असतानाच येथे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच मल्लिकार्जुन खरगे यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन नेत्यांना अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होण्याची संधी देण्याची शक्यता आहे. तसे संकेत खरगे यांनी दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *