विजापूर : घरातून बेपत्ता झालेला मुलगा दुसर्या दिवशी चिखलात पण सुखरूप सापडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावात घडली.
मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावातील संतोष मादर हा बालक कालपासून घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे चिंतेत होते. संतोष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने घरच्यांना त्याच्याबाबत आणखी जास्तच काळजी लागून राहिली होती. कालची रात्र घरच्यांनी त्याच्या आठवणीतच जागून काढली. तशातच आज सकाळी सुदैवाने तो घराजवळील तळ्याच्या चिखलात अडकून पडल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. त्याला ग्रामस्थांनी तातडीने बाहेर काढून जीवदान दिले. रात्रभर संतोष चिखलातच अडकून पडला होता. शौचाला जाऊन तो चिखलात अडकला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta