बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या तरीही मी आनंदी नाही. पक्षाला बहुमत मिळाले तरी मी समाधानी नाही. माझ्या आणि सिद्धरामय्या यांच्या घरी येऊ नका, असे आवाहन कर्नाटकचे नूतन उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज दि. २१ केले. बंगळूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांच्यासह माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेंगळुरू येथील कर्नाटक काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली वाहिली.
आता लोकसभा निवडणूक हेच लक्ष्य : शिवकुमार
डीके शिवकुमार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाले तरी मी आनंदी नाही. आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य आहे. आमचं पुढचं टार्गेट लोकसभा निवडणूक असून ती आणखी चांगल्या पद्धतीने लढवायला हवी.
भाजपने दहशतवादावर भाषण देऊ नये : सिद्धरामय्या
नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादावर बोलतात; पण ते सांगू शकतात का दहशतवादामुळे भाजपच्या कोणत्याही नेत्याला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेस दहशतवादाचे समर्थन करते, असा आरोप भाजप करते; पण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारखे नेते काँग्रेसचे अनेक नेते दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta