
बेंगळुरू : काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीत आमंत्रित केले आहे. डीके शिवकुमार आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. तर सिद्धरामय्या सायंकाळी रवाना होतील.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही दिल्लीला बोलावले असल्याचे कळते. गुरुवारी या संदर्भात एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
डीके शिवकुमार दुपारी 2.55 वाजता तर सिद्धरामय्या संध्याकाळी 6.30 च्या विमानाने रवाना होतील.
गेल्या शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह केवळ 8 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात आणखी 20-22 जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या इच्छुकांची लॉबिंग जोरात सुरू झाली आहे. उद्या सायंकाळपर्यंत स्पष्ट चित्र येण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta