बंगळुरु : कर्नाटक सरकार चालू वर्षात निवडणुकीत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या घोषणाची पुर्तता करणार असल्याची हमी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. शुक्रवारी (दि.२) कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे सरकार निवडणुकीत दिलेल्या वचनांचे पालन करेल. त्याचा एक भाग म्हणून कर्नाटकात ‘गृहज्योती’ योजने अंतर्गत १ जुलै पासून २०० युनीट वीज मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
राहुल गांधी यांची भारत यात्रा तसेच काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या जोडीने कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सत्तेची सुत्रे हाती घेताच निवडणुकीत जनेतेला देण्यात आलेल्या वचनांच्या पुर्ततेचा पाठपुरवा करताना दिसत आहेत. काँग्रेसने निवडणुकीच्या घोषणापत्रात ज्या पाच महत्त्वाच्या गोष्टी जनतेला देण्याचे वचन दिले होते त्या सर्व चालू वर्षात देऊ असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. १ जुलै पासून २०० युनीट पर्यंत वीज मोफत देण्याची त्यांनी आज घोषणा केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की ‘गृहज्योती’ योजने अंतर्गत २०० युनीट वीज मोफत दिली जाईल. याची अंमलबजावणी १ जुलै पासून सुरु होईल. ज्या नागरिकांनी जुलैपर्यंत बील भरले नसतील त्यांना पैसे द्यावे लागतील असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta