Tuesday , March 3 2026
Breaking News

मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करणार आज १४ वा अर्थसंकल्प!

Spread the love

 

बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करत असलेला हा 14वा विक्रमी अर्थसंकल्प आहे. त्यामुळे साहजिकच नवीन सरकार आणि सिद्धरामय्या यांच्या बजेटकडून लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी 12 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. याद्वारे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचे श्रेय सीएम सिद्धरामय्या यांना दिले जाणार आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हमी योजनेचे अनुदान आणि इतर अनुदान वाटपाच्या बाबतीत यावेळी अर्थसंकल्प आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे.

त्यांनी राज्याच्या सर्वसमावेशक विकास आणि दूरदर्शी कल्पनांचा सारांश दिला आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महत्त्वाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी केली. हमीभाव योजनांच्या अंमलबजावणीसाठी अनुदान, शेतकऱ्यांना बंपर ऑफरची शक्यता, नोकरी इच्छूक, नोकरभरती करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही वेळापूर्वी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *