Wednesday , April 22 2026
Breaking News

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

Spread the love

 

काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : ‘जय बाबा बर्फानी’च्या घोषात 1 जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा आज स्थगित करण्यात आली आहे. काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बालटालमधील पवित्र अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हवामान पूर्ववत होईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल.

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
काश्मीरमधील अनेक भागात पावसामुळे शुक्रवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आज कोणत्याही यात्रेकरूंना गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *